Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरी अन् १४२००० पगार; आयकर विभागात सुरु आहे भरती; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Income Tax Department Job: सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयकर विभागात सध्या चांगल्या पगाराची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

प्राप्तिकर विभागाअंतर्गत वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागातील अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी incometaxindian.gov.in वर जाऊन अर्ज शकतात. (Government Job)

आयकर विभागातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर आहे. आयकर विभागात ७ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल सेक्रिटरी, असिस्टंट, कोर्ट मास्टर आणि स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी पदासाठी १ जागा रिक्त आहे. पर्सनल सेक्रेटरीसाठी ३ पदे रिक्त आहेत. सहाय्यक पदासाठी १ पदे रिक्त आहे.कोर्ट मास्टर पदासाठी १ पद रिक्त आहे.

आयकर विभागाने या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी पदासाठी ४७,६०० ते १५११०० रुपये पगार मिळणार आहे. पर्सनल सेक्रेटरी पदासाठी ४४९०० ते १४२४००० रुपये पेमेंट मिळणार आहे. तर कोर्ट मास्टर पदासाठी २५५०० ते ८११०० रुपये मानधन मिळणार आहे. (Income Tax Department Job)

या नोकरीसाठी अधिसूचनेत दिलेला अर्ज व्यवस्थित भरावा. त्यानंतर तो आवश्यक कागदपत्रांसह अपीलीय न्यायाधिकरण सफेमा, चौथा मजला, ए विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे. (Income Tax Department Recruitment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Congress: भाजपच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांना तिकिट नको; काँग्रेस उमेदवार मुलाखतीवेळी वाद

माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना|VIDEO

Skin Care : मेकअप काढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

'पंचविशीत २-३ बीएचके फ्लॅट अन्... मुलीच्या कुटुंबाकडून भरमसाठ अपेक्षा चुकीचं', मराठी अभिनेत्रीचं लग्नाबाबत परखड मत

Shilpa Shetty: 420! अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल, प्रॉपर्टी होणार जप्त

SCROLL FOR NEXT