Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची संधी; पाटबंधारे विभागात भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Patbandhare Vibhag Bharti: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. पाटबंधारे विभागात सध्या भरती सुरु आहे. इंजिनियर पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सरकारी विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पाटबंधारे प्रकल्प मंडळाअंतर्गत ही भरती होणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याचसोबत अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही सर्व माहिती मिळवू शकतात. (Government Job)

पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-२, उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय अभियंता पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठीचे ठिकाणी बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ हे आहे.

या नोकरीसाठीची अधिकृत जाहीरात आणि अर्जाची माहिती तुम्हाला http://wrd.maharashtra.gov.in येथे मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. तुम्हाला अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ. जिल्हा परळी येथे पाठवायचा आहे.

पाटबंधारे विभागातील ही भरती राज्य श्रेणीअंतर्गत होणार आहे. या नोकरीसाठी रिटायर्ड इंजिनियर अर्ज करु शकतात. याचसोबत वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेघळी आहे. त्यामुळे इच्छुकांनी जाहिरात पाहूनच अर्ज करावेत.या नोकरीसाठी वेतन पदानुसार मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावेत.

सरकारी विभागात काम करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. ही भरती बीड येथे होणार आहे. त्यामुळे बीडमधील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. तुम्हाला सरकारी विभागात काम करायचा अनुभव आणि चांगले वेतनदेखील मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Police : एमडी तस्कर पोलिसांच्या ताब्यात; १२ ग्रॅम ड्रग्ससह मुद्देमाल जप्त

Viral Video : भाजप नेता Live डिबेटमध्ये पायजामा न घालताच बसले, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Manoj Jarange: ४० चोर घेऊन येवल्याचा आली बाबा लय बोलतो, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर प्रहार|VIDEO

Aabeer Gulaal: पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट भारतात होणार प्रदर्शित? वाचा महत्वाची अपडेट

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT