Government Job Google
naukri-job-news

Government Job: आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी; पगार ४०,००० रुपये; पात्रता आणि अर्ज कसा करावा?

Health Department Recruitment 2024: तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सध्या बिहार आरोग्य विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. बिहारच्या आरोग्य विभागात ही भरती जाहीर करण्यात आली आहे. बिहार नॅशनल हेल्थ मिशनअंतर्गत स्वास्थ्य आणि कल्याण केंद्रात भरती सुरु आहे.

बिहारच्या आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इच्छुक उमेदवारांनी shs.bihar.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. (Health Deapartment Recruitment)

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. आरोग्य विभागातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे.या भरतीमध्ये एकूण ४५०० पदांसाठी भरती केली जाणार आहे.

बीएससी (नर्सिंग) डिग्री किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात सीसीएचचा सहा महिन्यांचा कोर्स केलेले उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.२१ ते ४७ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० रुपये मानधन मिळणार आहे. (Government Job)

सध्या यूआयडीएआयमध्येही नोकरीची सुवर्णसंधी आहे. हैदराबाद येथील क्षेत्रीय कार्यालयात ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २ लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी चार्टड अकाउंटंट, एमबीए (फायनान्स) मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारू पिऊन सारखा त्रास द्यायचा; बायकोची सटकली, जबर मारहाणीत पतीचा मृत्यू

LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

Bhoplyache Soup Recipe : गरमागरम भोपळ्याचे सूप कधी प्यायलात का? एका घोटात येईल तरतरी

Maharashtra Live News Update: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर

Lpg Gas Cylinder: तुमच्या किचनमध्ये कोणतं इंधन वापरतात? LPG, PNG, CNG आणि LNG नेमका वापर काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT