Govt Jobs 2024 Saam Tv
naukri-job-news

Govt Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी मोठी बातमी, सरकारच्या कंपनीत PO च्या ४० जागा, कसा कराल अर्ज?

ECGC Probationary Officer Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारच्या ईसीजीएस कंपनीत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

भारत सरकारच्या ईसीजीसी लिमिटेड या कंपनीत भरती सुरु आहे. त्यामुळे ज्या तरुणांना सरकारी नोकरी करायची आहे. त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. ईसीजीसी लिमिटेडमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी कंपनीने अधिसूचना जाहीर केली आहे.

ईसीजीसी (ECGC) कंपनीतील ही भरती आयबीपीएसद्वारे (IBPS) आयोजित केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करु शकतात. ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२४ आहे. (Government Job)

भारत सरकारच्या मोठ्या कंपनीत ऑफिसर पदावर काम करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यालयातून पदवी प्राप्त केलेली असावी. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे,

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २१ ते ३० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना प्रिलियम टेस्ट द्यावी लागणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. (Government Exam)

या नोकरीसाठी प्रिलियम परीक्षा (Perliams Exam) २८ ऑक्टोबर २०२४ रोजी होण्याची शक्यता आहे. तर मुख्य परीक्षा १६ नोव्हेंबर २०२४ आहे.या परीक्षेमध्ये उमेदवारांना २०० प्रश्न विचारण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीनं जिंकली नाणेफेक, गुजरातला दिलं फलंदाजीचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीतून अभिमन्यू खोतकर यांची माघार

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा १५०० रुपये मिळणार? सुप्रिया सुळेंची फडणवीस सराकारकडे मोठी मागणी

Fort In Nashik : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

Monday Horoscope: कामाच्या ठिकाणी कौतुक होणार, ५ राशींचे बढतीचे योग आहेत; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT