Digital India Job Saam Tv
naukri-job-news

Digital India Job: सरकारी नोकरीची संधी; Digital India मध्ये सुरु आहे भरती; पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

Digital India Recruitment: इंजिनिरिंगचे शिक्षण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. डिजिटल इंडियामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. डिजिटल इंडियामध्ये फ्रंटेड डेव्लपर, फुल स्टॅक डेवलपर आणि डॅशबोर्ड/ रिपोर्ट डेव्लपर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये ९ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग नवी दिल्ली येथे केली जाणार आहे. (Digital India Recruitment

या नोकरीसाठी फ्रंटएंड डेव्लपरसाठी १ जागा रिक्त आहे. फुल स्टॅक डेव्लपर पदासाठी ४ जागा रिक्त आहे. मोबाईल डेव्हलपरसाठी १ जागा रिक्त आहे. डॅशबोर्ड आणि रिपोर्ट डेव्हलपर पदासाठी ३ जागा रिक्त आहेत.

या नोकरीसाठी अर्ज केलल्या उमेदवारांची शॉर्ट लिस्टिंग केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Digital India Job)

यूनियन बँक भरती

सध्या यूनियन बँकेत १५०० रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यूनियन बँकेत लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना गणपती बाप्पा पावला! १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या मोबाईलवर SMS आला का?

SCROLL FOR NEXT