Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; या कंपनीत सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Bharat Dynamics Limited Recruitment 2024: सरकारी कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी तरुणांकडे आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिसशिप पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी करिअरची सुरुवात करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. (Government Job)

भारत डायनामिक्स लिमिटेड ही मिनी रत्न कंपनी आहे.या कंपनीत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित ट्रेडमधून आयटी सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावी. १४ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

भारत डायनामिक्स लिमिटेडमधील नोकरीसाठी apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परिक्षेशिवाय करता येणार आहे. मेरिट बेसवर तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना पासपोर्ट साइज फोटो, जन्मदाखला, दहावी पास प्रमाणपत्र ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. (Bharat Dynamics Limited Recruitment)

रेल्वेत नोकरी

सध्या दक्षिण पश्चिम रेल्वेत ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्पोर्ट्स कोटाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. ४६ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT