Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Jobs: सरकारी कंपनीत HR होण्याची संधी, पगार ₹१,६०,०००; वाचा पात्रता अन् अर्जाची प्रोसेस

BEML Recruitment 2025: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बीईएमएलमध्ये एचआर असिस्टंट आणि एचआर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

BEML कंपनीत एचआर पदासाठी नोकरी

मिळणार पगार १,४०,००० रुपये

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मल्टी टेक्नोलॉजी कंपनी BEML मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बीईएमएल ही कंपनी सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येते. या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

बीईएमएल कंपनीत एचआर प्रोफेशनल पदासाठी भरती निघाली आहे. त्यामुळे एचआरमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही सरकारी कंपनीत एचआर असिस्टंट मॅनेजर बनू शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी तुम्ही bemlindia.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

BEML कंपनीत एकूण २२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑफिसर असिस्टंट (एचआर ग्रेड II), असिस्टंट मॅनेजर (ग्रेज III )पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करावेत.

बीईएमएल कंपनीत ऑफिसर एचआर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २९ वर्षे असावी तर असिस्टंट मॅनेजर एचआर पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा ३० वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

ऑफिसर एचआर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत फुल टाइम एमबीए (एचआर/आयआर) केलेले असावे. याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रीयल रिलेशनमध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोर्स केलेला असावा.याचसोबत ऑफिसर पदासाठी २ वर्षांचा अनुभव असावा तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ४ वर्षांचा अनुभव असावा. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT