Anganwadi Bharti Saam Tv
naukri-job-news

Anganwadi Bharti: १२वी पास महिलांना नोकरीची सुवर्णसंधी; अंगणवाडीत तब्बल ४९७ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Anganwadi Bharti 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. अंगणवाडीत तब्बल ४९७ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. अंगणवाडीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तब्बल ४९७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही balvikasup.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

१२वी पास तरुणांसाठी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. बाल विकास परियोजना कार्यालयाअंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी महिलांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. (Government Job)

या नोकरीसाठी एकूण ४९७ पदांवर भरती केली जाणार आहे. त्यातील गोंडा येथे २४३ पदे रिक्त आहे. देवरिया येथे २५४ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवार ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास केलेली असावी.या नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड मेरिट बेसिसवर केली जाणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपज्ञ, जाती प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो ही कागदपत्रे लागणार आहेत. (Anganwadi Bharti 2024)

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळातदेखील नोकरीची सुवर्णसंधी आहे. ESIC मध्ये रेजिडेंट, सुपर स्पेशलिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २ लाख रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT