Aarogya Vibagh Bharti 2024 Saam Tv
naukri-job-news

Aarogya Vibagh Bharti 2024: महाराष्ट्रात आरोग्य विभागात सुरु आहे भरती; १२ वी पास उमेदवार करु शकतात अर्ज;जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

महाराष्ट्रात आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती सुरु आहे. याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

आरोग्य विभागात डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक आणि इतर पदांची भरती सुरु आहे. यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. नोकरीसाठी १२ वी पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन १८००० ते २८००० रुपये मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २१ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्यात येणार आहे. मेडिकल कोऑर्डिनेटर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS/BAMS/BHMS/Dentist पदवी प्राप्त असावी.

अकाउंटंट/ बिलिंग क्लर्क या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. त्यांना अकाउंटिगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. डेटा एन्ट्री या पदासाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.रत्नागिरी जिल्ह्यात यासाठी नोकरीचे ठिकाण असेल.

१ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे पाठवायचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT