Bank Jobs Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: सरकारी बँकेत मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

EXIM Bank Recruitment 2025: सरकारी बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एक्झिम बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी, मॅनेजर अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकिंग क्षेत्रात करिअर करायचा विचार करताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. एक्झिम बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एक्झिम बँक (EXIM Bank) ही केंद्र सरकारअंतर्गत काम करते. या बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी, डेप्युटी मॅनेजर, चीफ मॅनेजर अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे.

एक्झिम बँकेत २८ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २२ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइट eximbankindia.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

एक्झिम बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी- डिजिटल टेक्नोलॉजीसाठी १० जागा रिक्त आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी रिसर्च अँड अॅनालिसिस पदासाठी ५ जागा रिक्त आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी राजभाषासाठी २ तर लीगल मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ५ जागा रिक्त आहेत.

डेप्युटी मॅनेजर (लीगल) पदासाठी ४ जागा रिक्त आहे. डेप्युटी मॅनेजर ज्युनियर मॅनेजमेंट पदासाठी १ जागा रिक्त आहे. चीफ मॅनेजर पदासाठी १ जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

एक्झिम बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शुल्कदेखील भरायचे आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम eximbankindia.in या वेबसाइटवर जा.

यानंतर होमपेजवर करिअर या सेक्शनमद्ये जा.

यानंतर EXIM Bank Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करा. यानंतर सर्व माहिती वाचा.

यानंतर New Registration करुन सर्व माहिती भरावी.

यानंतर लॉग इन करा. सर्व फॉर्म, कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर शुल्क भरा. फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT