NTPC Recruitment saam Tv
naukri-job-news

NTPC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NTPC मध्ये १८२ पदांसाठी भरती; अर्ज कसा कराल?

NTPC Green Energy Recruitment: तरुणांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ११ एप्रिलपासून अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एनटीपीसी लिमिटेडमध्ये (NTPC Recruitment) सध्या भरती सुरु आहे. तरुणांसाठी नोकरी करण्याची संधी आहे. एनटीपीसीची सहायक कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये अनुभवी प्रोफेशनल्स पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

एनटीपीसी ग्रीन एनर्जीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या भरती मोहिमेत एकूण १८२ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखदेखील समोर आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही १ मे २०२५ पूर्वी अर्ज करु शकतात.या नोकरीबाबत वेबसाइटवर सविस्तर माहिती दिली आहे.

इंजिनियर (Engineer)(आरई-सिविल) पदासाठी ४० जागा रिक्त आहेत.इंजिनियर(आरई इलेक्ट्रिकल) साठी ८० पदे रिक्त आहे. इंजिनियर (आरई मेकॅनिकल)पदासाठी १५ जागा रिक्त आहे. कार्यकारी (एचआर) पदासाठी ७ पदे रिक्त आहे. कार्यकारी (फायनान्स)२६ पदे रिक्त आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड स्क्रिनिंग, लेखी परीक्षा आणि लेखी परीक्षा, इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. एनटीपीसी भारत अग्रणी विद्युत कंपनी आहे. या कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT