Post Office Recruitment Google
naukri-job-news

Post Office Bharti: १०वी पास तरुणांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Post Office Recruitment 2025: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पोस्ट ऑफिसमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडिया पोस्ट विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या भरतीबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (India Post Office Recruitment 2025)

भारतीय टपाल विभागातील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षे असावी.

इंडिया पोस्ट ऑफिसची ही भरती वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. सेंट्रल रिजनमध्ये १ रिक्त जागा आहे. एमएमएस चेन्नई येथे १५ जागा रिक्त आहेत. साउथ रिजनमध्ये ४ जागा रिक्त आहे. वेस्टर्न रिजनमध्ये ५ जागा रिक्त आहे. एकूण २५ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे.

भारतीय डाक विभागातील स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. त्यासोबत उमेदवाराकडे लाइट आणि हेवी मोटर व्हेईकल चालवण्याचे लायसन्स असायला हवे. उमेदवाराकडे तीन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.ही भरती ग्रुप सी डेप्युटेशन/ऑब्झर्व्हेशन बेसवर केली जाणार आहे. (Post Office Recruitment 2025)

इंडिया पोस्ट ऑफिसमधील भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला लेवल २ नुसार १९,९०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. या नोकरीसाठी अर्ज सिनियर मॅनेजर, मेल मोटर सर्विस, नंबर ३७, ग्रीम्स रोड, चेन्नई ६००००६ येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

SCROLL FOR NEXT