सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ईपीएफओमध्ये यंग प्रोफेशनल (लीगल) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
ईपीएफओमधील नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी epfindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अधिकृत नोटिफिकेशन २५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे.
अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर तुम्हाला २१ दिवसांच्या आत अर्ज करायचा आहे. म्हणजेच ११ फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी किंवा कायद्यात पदवी प्राप्त केलेली असावी. (EPFO Recruitment)
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (EPFO Recruitment 2025)
माझगाव डॉकमध्ये नोकरी
सध्या माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. माझगाव डॉकमध्ये इंजिनियरिंग डिप्लोमा पदवीधरांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २०० अप्रेंटिस पदासाठी ही भरती असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. यामध्ये वेगवेगळ्या इंजिनियरिंगसाठी वेगवेगळ्या जागा रिक्त आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.