Railway Job Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs : सरकारी नोकरीची संधी, ईस्टर्न रेल्वेत ३००० पेक्षा जास्त पदांसाठी पदभरती; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Eastern Railway Recruitment: ईस्टर्न रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. जवळपास ३००० पेक्षा जास्त अप्रेंटिस पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. रेल्वेत नोकरी करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. परंतु सध्या ईस्टर्न रेल्वेत ३००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पूर्व रेल्वेत ३००० पेक्षा जास्त ट्रेड अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना rrcrecruit.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रोसेस २४ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२४ आहे. (Railway Recruitment)

पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी फिटर, वेल्डर, सुतार, इलेक्ट्रिशियन, वायरमन यासह अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.पूर्व रेल्वेच्या अनेक विभांगामध्ये ही भरती होणार आहे. ३११५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ईस्टर्न रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याशिवाय संबंधित ट्रेडमध्ये IT/NCVT प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.याबाबत अधिसूचना तुम्ही रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. (Railway Job)

या अप्रेंटिस पासाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे. उमेदवारांची निवड ही १०वी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. (Railway Apprentice Recruitment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT