DRDO Recruitment Saam Tv
naukri-job-news

DRDO Recruitment: फ्रेशर्स आहात? DRDO मध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

DRDO Recruitment 2025: डीआरडीओमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुमचे जर शिक्षण पूर्ण झाले असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

नुकतंच शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सरकारी कंपनीत इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटन (DRDO) डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च लॅबोरेटरी लवकरच इंटर्नशिप योजना सुरु करणार आहे. या इंटर्नशिपसाठी तुम्ही अर्ज करु शकतात. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२५ आहे.

डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च लॅबोरेटरीमधील या इंटर्नशिपसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या इंटर्नशिपमध्ये ३ वेवगेळ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (ECE), कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनियरिंग अशा तीन पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.७५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

डीआरडीओमधील ही इंटर्नशिप पेड असणार आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई/बीटेक अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी अर्ज करताना उमेदवारांना ज्या विषयात इंटर्नशिप करायची आहे ते नमूद करायचे आहे.

डीआरडीओमधील इंटर्नशिपचा कालावधी ६ महिन्यांचा असेल. या काळात तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. पहिले तीन महिने पूर्ण झाल्यानंतर १५००० रुपये स्टायपेंड मिळेल. यानंतर इंटर्नशिप कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे दिले जाईल. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला स्टायपेंड आणि सर्टिफिकेट मिळणार आहे.

या इंटर्नशिपसाठी उमेदवारांची निवड ३ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या टक्केवारीनुसार केली जाईल. तसेच वयोमर्यादा आणि पडताळणीनंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज कसा करावा?

डीआरडीओ इंटर्नशिपसाठी अर्ज करताना उमेदवारांना www.drdo.gov.in/drdo/careers वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर फॉर्म आणि कागदपत्रे hrdc.dlrl@gov.in वर मेल करावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT