ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय रेल्वेमधून तुम्ही अनेकदा प्रवास केला असेल, ही एक खास अनुभूती देणारी यात्रा असते.
रेल्वे क्षेत्रात विविध प्रकारचे विशिष्ट शब्द आणि परिभाषा वापरल्या जातात, जे प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात.
आज आपण रेल्वे प्रवासात वापरल्या जाणाऱ्या 'CNF' या संज्ञेचा अर्थ आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
तुम्हाला माहीत आहे का, रेल्वे तिकिटावर ‘CNF’ म्हणजे नेमकं काय दर्शवते आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे?
तिकिटावर CNF नसल्यास याचा अर्थ तुमची जागा निश्चित नाही आणि ती प्रतीक्षा यादीत असू शकते.
प्रवासात आरक्षित जागा नसतानाही त्या सीटवर बसल्यास गैरसोयीचा सामना करावा लागतो आणि दंडही होऊ शकतो.
ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी तुमचे तिकीट कन्फर्म (CNF) आहे की नाही, हे एकदा नक्की तपासणे आवश्यक आहे.