DRDO Recruitment Saam Tv
naukri-job-news

DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

DRDO Recruitment 2025: डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओमध्ये डिप्लोमा आणि आयटीआय अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओमध्ये काम करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. ज्या विद्यार्थ्यांना सायन्स अँड टेक्नोलॉजीमध्ये रस आहे त्यांच्यासाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. डीआरडीओने अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे.

डीआरडीओमध्ये २० पदांसाठी भरती केली जाणार आहे. डिप्लोमा आणि आयटीआर अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. डीआरडीओमधील नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२५ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती drdo.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

पात्रता (DRDO Eligibility)

डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करताना उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून अंभियांत्रिकी किंवा टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा केलेला असावा. आयटीआय अप्रेंटिसशिप पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वोकेशनल कोर्ससाठीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावी.

अप्रेंटिस पदासाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.ही अप्रेंटिसशिप १ वर्षासाठी असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाणार आहे.

स्टायपेंड (Stipend)

डीआरडीओमधील अप्रेंटिसशिप पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ८००० रुपये स्टायपेंड दिली जाईल. आयटीआय अप्रेंटिसशिप पदासाठी ७००० रुपये स्टायपेंड दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents For DRDO Apprenticeship)

अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे १०वी, १२वीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. याचसोबत डिप्लोमा किंवा आयटीआर प्रमाणपत्र, फोटो, पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, वैद्यकीय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

सरकारी कंपनीत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात करिअरच्या दृष्टीने खूप फायदे होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील भोसरीत टेम्पोचा अपघात; दुचाकीस्वारावर जखमी

Chandrapur Voter: एकाच घरातील ११९ मतदारांपैकी एक महिला अखेर सापडली; नव्या दाव्यानं नवा ट्विस्ट

Meat Ban Row : १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी; विरोधकांकडून चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा पार्टी, कधी अन् कुठे?

Sanjay Raut: गद्दारांचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता कामा नये; संजय राऊतांचे सैन्य अधिकाऱ्यांना पत्र|VIDEO

OBC Reservation: मोदी सरकार OBC आरक्षणात बदल करणार, काय आहे कारण? कोणाला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT