दिल्ली मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. दिल्ली मेट्रोत सुपरवायजर, ज्युनिअर इंजिनियर, असिस्टंट सेक्शन इंजिनियर, सिनियर सेक्शन इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी delhimetro.rail.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (Delhi Metro Recruitment 2024)
दिल्ली मेट्रोतील इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
दिल्ली मेट्रोतील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग, आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५५ ते ६५ वर्ष असायला हवे. या नोकरीसाठी तुमची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीनंतर तुम्हाला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना त्यांच्या वयानुसार आणि अनुभवानुसार वेतन दिले जाणार आहे. ३५४०० ते ११२४०० रुपये पगार या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. (Delhi Metro Job)
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने career@dmrc.org या ई-मेलवर जाऊन अर्ज करावा. त्याचसोबत तुम्ही कार्यकारी निर्देशक, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंभा रोड, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.