Chandrapur Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: चंद्रपूर महानगरपालिकेत मोठी भरती; मिळणार ७५ हजार रुपये पगार; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Chandrapur Municipal Corporation Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १३ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. २९ ऑगस्ट २०२४ ही नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

मेडिकल ऑफिसर, मायक्रो बायोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, फार्मासिस्ट, ANM या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. मेडिकल ऑफिसर म्हणून उमेदवारांना MBBS पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मायक्रो बायोलॉजिस्ट पदासाठी उमेदवाराकडे MBBS, MD पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. याच उमेदवाराने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी उमेदवाराने MBBS/ BDS/ BAMS/ BHMS/ BUMS यापैकी पदवी असणे गरजेचे आहे. फार्मासिस्ट पदासाठी उमेदवाराने विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत D.Pharm किंवा B.Pharm उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या उमेदवारांकडे ANM प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या भरतीत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या भरतीत ३८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

मेडिकल ऑफिसर पदासाठी ६०,००० रुपये पगार दिला जाणार आहे.मायक्रोबायोलॉजिस्ट पदासाठी ७५,००० रुपये पगार दिला जाणार आहे. तर पब्लिक हेल्थ मॅनेजर पदासाठी ३२,००० रुपये पगार दिला जाणार आहे. तर फार्मासिस्ट पदासाठी १७००० रुपये पगार दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

'70 पैकी 35 टक्केच जंगल शिल्लक' कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे संतापले|VIDEO

Sweet Bor Recipe : दिवाळीचा फराळ होईल खास! बनवा कोकण स्पेशल खुसखुशीत गोड बोरं, खूपच सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

SCROLL FOR NEXT