Central Bank Of India Recruitment 2025 Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरू; आजच करा अर्ज

Central Bank Of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.सेंट्रल बँकेत काउंसिलर आणि बीसी सुपरवाइजर पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सेंट्रल बँकेत नोकरी करायची संधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत काउंसलर आणि बीसी सुपरवाइजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय ही भरती होणार आहे. (Central Bank Of India)

या भरती मोहिमेत अर्जप्रक्रिया २१ मेपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट www.centralbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

सेंट्रल बँकेत एफएलसी काउंसिलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत त्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. एमएस ऑफिस, इंटरनेट आणि टाइपिंग यायला हवे. स्थानिक भाषेत टायपिंग करता यायला हवे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने राष्ट्रीय बँकेत किंवा रुरल बँकेत स्केल १ ऑफिसर किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावर काम केलेले असावे. सेवानिवृत्त किंवा वीआरएसप्राप्त अधिकारी या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

बीसी सुपरवाइजर पदासाठी रिटारर्ड किंवा फ्रेशर्स कोणीही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवाराने एम.एससी (IT)/BE (IT)/ MCA/MBA केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराचे वय २१ ते ४५ वयोगटातील असावे. रिटायर्ड कर्मचाऱ्यांचे वय ६० वर्ष ते ६४ वर्ष असावे. (Central Bank Of India Recruitment)

पगार

काउंसलर आणि सुपरवाइजर पदासाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. इंटरव्ह्यूद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. एफएलसी काउंसलर पदासाठी २५००० रुपये पगार तर बीसी सुपरवाइजर पदासाठी १५००० रुपये पगार मिळणार आहे.

तिरुवनंपुरम येथील सेंट्रल बँकेत ही भरती केली जाणार आहे. तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या फॉर्मॅटनुसार फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रीजनल ऑफिस, सेकंड फ्लोर, सीएस बिल्डिंग, पुलिमोडू एमजी रोड, तिरुवनंतपुरम, केरळ ६९५०००१ येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT