Central Bank of India Recruitment  Saam Tv
naukri-job-news

Central Bank Recruitment: खुशखबर! सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; २७५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सेंट्रल बँकेत नोकरीची संधी

स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती

२७५ पदांसाठी भरती

बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत आयटी, सायबर सिक्युरिटी या विभागात नोकरी करण्याची संधी आहे. अनुभवी उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. २७५ पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ फेब्रुवारीपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२६ असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

या पदांसाठी होणार भरती

सेंट्रल बँकेत २७५ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट,मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन, डिजिटल चॅनल मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा, नेटवर्क अँड क्लाउड मॅनेजमेंट, विंडोज आणि अॅक्टिव्ह डायरेक्टरी अॅडमिनिस्ट्रेशन, डेटा इंजिनियरिंग अशा विविध विभागात भरती होणार आहे.

पात्रता

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई आणि बीटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. एमसीए डिग्रीप्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. २ ते १० वर्षांचा अनुभव असायला हवा.

अर्ज कसा करावा? (Application Process)

तुम्हाला सर्वात आधी सेंट्रल बँकेच्या वेबसाइटवर जायचे आहे. तिथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.यानंतर नंबर एसएमएस किंवा ईमेलवर पाठवला जाईल.

यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे.

तुमची सर्व माहिती भरायची आहे. याचसोबत कागदपत्र अपलोड करा.

यानंतर एकदा फॉर्म चेक करुन त्याची प्रिंट आउट काढायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Holi 2026 : होळीला पांढरेच कपडे का घालतात? जाणून घ्या कलरफुल सणाच्या ड्रेस कोडचा खरा अर्थ

Maharashtra Live News Update : अजित पवारांच्या विमानातील दोन्ही वैमानिकांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले जाणार

Iran-Israel War: इस्राइलचा बेरूतवर हल्ला, रहिवासी भागांना केलं लक्ष्य; १० जणांचा मृत्यू

Gold Rate Today: खुशखबर! होळीच्या दिवशी सोनं झालं स्वस्त; प्रति तोळा ३००० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

Shocking : "ती नसताना मी जगून काय फायदा?" प्रेयसीचा अपघातात मृत्यू, प्रियकराने ४८ तासांत संपवलं स्वतःच जीवन

SCROLL FOR NEXT