Bank Job Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; २५३ पदांसाठी भरती

Central Bank Of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. २५३ रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १८ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदनारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्ही centralbankofindia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. (Central Bank Of India Recruitment)

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. या नोकरीसाठी पदानुसार पात्रता बदलली जात आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २३ ते ४० वर्ष असणे गरजेचे आहे. ही वयोमर्यादादेखील पदानुसार बदलते.

अर्ज कसा करावा?

नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी centralbankofindia.co.in या वेबसाइटला भेट द्या.

त्यानंतर रिक्रूटमेंट वर क्लिक करा. त्यानंतर अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

यानंतर Click Here For New Registration वर क्लिक करा.

यानंतर तुम्ही इतर माहिती, फोटोग्राफ आणि सही अपलोड करा.

यानंतर तुम्ही शुल्क जमा करुन फॉर्म सबमिट करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. एकूण २५३ रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे.

रेल्वेत भरती

सध्या रेल्वेमध्येही भरती सुरु आहे. स्पोर्ट्समॅन पदासाठी ही भरती केली जाणार आहे. ज्यांना खेळाची आवड आहे त्यांच्यासाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT