Canara Bank Job Saam Tv
naukri-job-news

Canara Bank Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत ३५०० पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

Canara Bank Recruitment 2025: कॅनरा बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कॅनरा बँकेत तब्बल ३५०० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बँकिंग फिल्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कॅनरा बँकेत फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी आहे. कॅनरा बँकेत तब्बल ३५०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

कॅनरा बँकेतील ही भरती अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. देशातील अनेक ब्रँचसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट बेसद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

कॅनरा बँकेतील या अप्रेंटिसशिप पदासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. २३ सप्टेंबरपासून तुम्ही अर्ज करु शकतात. दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहे. जर तुम्हाला बँकिंग फिल्डमध्ये नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे.

कॅनरा बँकेतील या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेद्वारे केली जाणार आहे. १२वी किंवा डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. त्यानुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि स्थानिक भाषा तपासणी केली जाणार आहे.

कॅनरा बँकेतील अप्रेंटिसशिप पदाचा कालावधी १२ महिन्याचा असणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १५००० रुपये पगार मिळणार आहे.

कॅनरा बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ग्रॅज्युट असणे गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्ही अर्ज करु शकतात. तुम्हाला www.nats.education.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर www.canarabank.bank.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Rain : सीना नदीचं रौद्ररूप! पूरामुळे रेल्वे-रस्ते वाहतूक ठप्प, ९ ट्रेन रद्द, प्रवाशांचे हाल | VIDEO

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावर

Sangli Rain : जत पूर्व भागामध्ये पावसाने पिकांची हानी; हजारो हेक्टरमधील डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त

Ind vs Wi: टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला; अनुभवी खेळाडूंकडे जबाबदारी, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 15 शिलेदार निवडले

Jio And Airtel: २०० रुपयांपेक्षा स्वस्त! जिओ आणि एअरटेलचा बजेट मासिक रिचार्ज, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT