BSNL Recruitment Saam Tv
naukri-job-news

BSNL Recruitment: बीएसएनएलमध्ये नोकरीची संधी; १२० पदांसाठी भरती; पगार ५० हजारांपर्यंत; वाचा सविस्तर

BSNL Recruitment 2025: बीएसएनएलमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सध्या बीएसएनएलमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

BSNL मध्ये नोकरीची संधी

फ्रेशर्ससाठी सरकारी नोकरीची संधी

पगार ५० हजारापर्यंत

भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सरकारची टेलिकॉम कंपनी म्हणजे बीएसएनएलमध्ये भरती निघाली आहे. भारत संचार निगम लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी कोणताही अनुभव मागितला नाहीये. फ्रेशर्स या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

बीएसएनएलमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी भरती जाहीर केली आहे. टेलिकॉम स्ट्रीम आमि फायनान्स स्ट्रीममध्ये ही भरती जाहीर केली आहे. यामध्ये १२० पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर रोजी याबाबत माहिती दिली. दरम्यान, अर्जप्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे. तुम्ही bsnl.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

पगार

बीएसएनएलमधील या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २४९०० ते ५०,५०० रुपये बेसिक सॅलरी मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील दिले जाणार आहेत.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनियरिंग/बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी (B. Tech) केलेले असावे. टाइम इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी उमेदवारांनी सीए किंवा सीएमए पूर्ण केलेले असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील जुना बाजार चौकात 'राडा'

ASI पोलिसाची धारदार शस्त्राने हत्या, निर्जनस्थळी रक्ताळलेल्या अवस्थेत फेकून दिलं, पोलीस दलात खळबळ

शेतकऱ्यांचा रोष उफाळला! कर्जमाफीच्या मागणीवरून अजित पवारांना काळे झेंडे, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

Tamhini Ghat Accident : काळाचा घाला! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून दगड कारमध्ये पडले, महिलेचा जागीच मृत्यू

Dhaba Style Malai Kofta Recipe: ढाबा स्टाईल मलाई कोप्ता घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT