Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही सर्वात श्रीमंत अभिनेत्रीपैंकी एक आहे. ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती किती आहे हे आज जाणून घेऊया.
माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या काळजात घर केलं आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय लक्झरीयस लाईफ जगते. ऐश्वर्या रायची संपत्ती कोटींमध्ये आहे.
माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही ८२८ कोटी रुपयांची मालकीण असून, ती सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.
ऐश्वर्या राय ब्रँड अम्बेसिडर देखील आहे. एका ब्रँडिंग जाहीरातीमधून ऐश्वर्या सुमारे ८० ते ९० कोटी रूपये कमावते.
ऐश्वर्याकडे महागड्या कारचं कलेक्शन आहे. तिच्याकडे मर्सिडीज बेंझ एस 350 डी कूप आणि Audi A8 L सारख्या महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.