Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; पगार १.७७ लाख; अर्ज कसा करावा?

Bombay High Court Recruitment: मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. उच्च न्यायलयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई हायकोर्टात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मुंबई हायकोर्टात स्टेनोग्राफर ग्रेड १ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टातील अर्जप्रक्रिया २७ ऑक्टोबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज bombayhighcourt.nic.in या वेबसाइटवर करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे.

मुंबई हायकोर्टातील नोकरीसाठी स्टेनोग्राफर पदासाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत तुम्हाला महागाई भत्ता, एचआरए आणि इतर सरकारी अलाउंसदेखील मिळणार आहे.

पात्रता

मुंबई हायकोर्टातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएशन पदवी असावी. लॉ ग्रॅज्युएट्स उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. याचसोबत उमेदवाराला इंग्लिश शॉर्टहँड सर्टिफिकेट मिळालेले असावे. २१ ते ४३ वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.

मुंबई हायकोर्टातील नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मुंबई हायकोर्टातील या नोकरीसाठी सिलेक्शन तीन स्टेजमध्ये होणार आहे.शॉर्टहँड टेस्ट होणार आहे. त्यानंतर टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. यानंतर मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. परीक्षा आणि इंटरव्ह्यूची तारीख अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी bombayhighcourt.nic.in वेबसाइटवर जा.

यानंतर Recruitment सेक्शनवर जा. यानंतर Stenographer (Grade-3) वर क्लिक करा.

यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करावे.यानंतर लॉग इन करा.

यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक सर्टिफिकेट आणि इतर माहिती भरा.

यानंतर तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रिंट आउट काढून ठेवा.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रोसेस २७ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे. याबाबत सर्व माहिती वेबसाइटवर दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT