BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;या पदासाठी सुरु आहे भरती;पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या

Siddhi Hande

Government BMC Job Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नेहमी भरती जाहीर केली जाते. सध्या बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. या हॉस्पिटलमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅब टेक्निशियन पदासाठी भरती सुरु आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतअंतर्गत असणाऱ्या बा.य.ल.नायर धर्मादाय रुग्णालयात १८ जागांसाठी भरती जाहिरात करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ आहे.

लॅब टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc पदवी प्राप्त केलेली असावी त्याचसोबत DMLT (Diploma In Medical Laboratory Technology) ची पदवी असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.

बा.य.ल नायर धर्मादाय रुग्णाल, डॉ.ए.एल.नायर रोड, मुंबई सेंट्रल-४०० ००८ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवार २० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात.

सध्या रेल्वे एनटीपीसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ११५८८ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT