BMC Recruitment Google
naukri-job-news

BMC Recruitment: बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी;मिळणार ७०,००० पेक्षा जास्त पगार;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. महानगरपालिकेत वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीत निवड झालेल्या उमेदवारांना ७०,००० रुपयांपेक्षा जास्त पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु आहे. २६ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. रजिस्ट्रार आणि हाउस ऑफिसर पदासाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०२४ आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १६ जुलै २०२४ नंतर अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि एचओडी (हेल्थ केअर सर्व्हिसेस), के. बी. भाभा हॉस्पिटल, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर मार्ग, मुंबई येथे अर्ज पाठवायचा आहे.

या नोकरीमध्ये उमेदवाराची रजिस्ट्रार पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला ७६,८४८ मासिक वेतन मिळेल. तर इन हाउस ऑफिसर पदासाठी ७६,१०४ रुपये मासिक वेतन दिले जाईल.

या नोकरीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा ३३ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३८ वर्ष वयाची अट निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यास दिलेल्या ठिकाणी उमेदवाराने रुजू होणे गरजेचे आहे. तसेच निवड झालेला उमेदवार पुढील ३ वर्षांसाठी कुठे अर्ज करण्यालाठी पात्र नसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT