BSF Recruitment: BSF मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती; मिळणार १,१२,००० रुपये पगार;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या एका क्लिकवर

BSF Recruitment 2024: बीएसएफमध्ये नोकरी करायची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बीएसएफमध्ये पॅरामेडिकल स्टाफमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
BSF Recruitment
BSF RecruitmentSaam Tv
Published On

देशाची सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दलाने मोठी भरती जाहीर केली आहे. बीएएसएफ पॅरामेडिकलमध्ये ही नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२४ आहे. मुदतीनंतर अर्ज केल्यास उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

BSF Recruitment
Government Job: कोणतीही परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी; १,८२,००० रुपये मिळणार पगार;अर्ज कसा करायचा?जाणून घ्या

BSF या भरतीमध्ये पॅरामेडिकल स्टाफमध्ये एकूण ९९ पदे भरण्यात येणार आहे. ही पदे ब आणि सी गटातील आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. rectt.bsf.gov.in या वेबसाइटवरुन तुम्ही अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवाराची पात्रता आणि वयोमर्यादा पोस्टनुसार वेगवेगळी आहे. याबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत आयटीआय डिप्लोमा झालेला उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. तसेच सहाय्यक कमांडंट पदासाठी उमेदवाराने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी २० ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे घेतली जाईल. यामध्ये शारीरिक मानक चाचणी, शारिरीक कार्यक्षमता चाचणी, लेखी परीक्षा, वैद्यकीय परीक्षा घेतली जाईल. हे सर्व टप्पे पार केल्यानंतरच उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.

BSF Recruitment
Air Force Agniveer Recruitment: भारतीय वायुसेनेत अग्नीवीरवायू पदांसाठी भरती सुरू; 'इतका' मिळणार पगार; जाणून घ्या संपूर्ण माहिती

बीएसएफच्या या भरतीमध्ये निवड झाल्यास भरघोस वेतन देण्यात येईल. पदानुसार उमेदवाराचे वेतन असेल. SI पदासाठी पे स्केल ६ नुसार ३५,४०० ते १,१२,४०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.एएसआय पदासाठी २९,००० ते ९२,००० रुपये मासिक वेतन दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com