Bank Of India Recruitment Saam Tv
naukri-job-news

Bank Of India Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; नोकरीसाठी पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Bank Of India Recruitment 2024: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. बँकेत फॅकल्टी आणि वॉचमन या दोन पदांसाठी जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी ८वी, ९वी, १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. याबाबत जाहिरात बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केली आहे.

बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या जाहिरातीत वॉचमन आणि फॅकल्टीमध्ये रिक्त पदांवर भरती केली जाणार असल्याचे सांगितले आहे. या नोकरीसाठी १८ ते ६५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ऑफलाइन पद्धतीने हे अर्ज पाठवायचे आहेत.

दोन वर्षांसाठी कंत्राटी पदावर ही भरती केली जाणार आहे. वॉचमन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान ८ वी पास असणे गरजेचे आहे. फॅकल्टीमध्ये जॉइन होण्यासाठी उमेदवाराने पदवी प्राप्त केली असणे गरजेचे आहे. त्यांना संगणकाचे ज्ञान असावे. स्थानिक भाषा तसेच हिंदी, मराठी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असावे. ही भरती वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाखांसाठी होणार आहे. वॉचमन पदासाठी उमेदवाराला ५ हजार रुपये पगार देण्यात येईल तर फॅकल्टीमध्ये २०,००० रुपये पगार देण्यात येईल.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२४ आहे. नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेत पास झाल्यानंतरच मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल. या नोकरीसाठी उमेदवारांना अर्ज बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, विदर्भ विभागीय कार्यालय, पहिला मजला, बँक ऑफ इंडिया इमारत, महावीर उद्यान, वर्धा येथे अर्ज पाठवायचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीकडे असलेल्या 'या' ७ महागड्या गोष्टी; किंमत ऐकून व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: नगर- मनमाड महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

Panipuri Pani Recipe: पाणीपुरीचं आंबट-गोड पाणी बनवण्याची सीक्रेट रेसिपी; आजच करा ट्राय

Thursday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, दवाखाने मागे लागतील; 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष खबरदारी

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

SCROLL FOR NEXT