BOB Recruitment Saam Tv
naukri-job-news

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; मॅनेजर पदांसाठी होणार भरती; मिळणार भरघोस पगार

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदात मॅनेजर आणि ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ बडोदा भरती

मॅनेजर, ऑफिसर पदांसाठी होणार भरती

पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून म्हणजेच ६ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) मॅनेजर, अॅग्रीकल्चर ऑफिसर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला bankofbaroda.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२५ आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये ४१७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. सेल्स मॅनेजरसाठी २२७ पदे रिक्त आहे. अॅग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर पदासाठी १४२ आणि अॅग्रीकल्चर मार्केटिंग मॅनेजर ४८ जागा रिक्त आहेत. विविध विभागात ही भरती होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्राचे ज्ञान आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करु शकतात.

पात्रता (Eligibility)

मॅनेजर सेल्स पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. २४ ते ३४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. याचसोबत इतर पदांसाठी कृषीय, पशुपालन, पशु चिकित्सा विज्ञान, डेअरी यासंबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी वयोमर्यादा २४ ते ४२ निश्चित करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिसूचना वाचा.

अर्ज कसा करावा? (How To Apply)

सर्वात आधी तुम्हाला bankofbaroda.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा.

यानंतर सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT