Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Railway Apprentice Recruitment: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam Tv
Published On

रेल्वेत नोकरी (Railway Recruitment) करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने नुकतीच ईस्टर्न रेल्वेच्या युनिटसाठी भरती जाहीर केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने ही भरती जाहीर केली आहे. ३००० पेक्षा जास्त अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी rrcer.org या वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२५ आहे.

Railway Recruitment
Government Job: खुशखबर! गृह मंत्रालयात नोकरीची संधी, पगार २१५९०० रुपये, अर्ज कसा करावा?

रेल्वेची ही नवीन भरती ईस्टर्न रीजनमध्ये होणार आहे. फिटर, वेल्डर, मेकॅनिस्ट, कारपेंटर, पेंटर, लाइटमॅन, वायरमॅन, इलेक्ट्रिशियन अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. हावडा, लिलुआ, कंचनजंगा अशा विविध ठिकाणी ही भरती केली जाणार आहे,

रेल्वे अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत NCVT/SCVT द्वारे संबंधित ट्रेडमध्ये प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.

Railway Recruitment
BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाहीये. उमेदवारांची निवड मेरिट बेसिसवर शॉर्टलिस्टिंग आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे होणार आहे.

अर्ज कसा करावा? (How to Apply)

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला rrcer.org या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर करिअर ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया पूर्ण करा.

तुम्ही फोटो आणि सही अपलोड करा.

यानंतर अर्जशुल्क अपलोड करुन प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

Railway Recruitment
First Job Scheme : तरुणांसाठी आजपासून PM-VBRY सुरू, १५००० रुपये मिळणार, वाचा संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com