Bank Of Baroda Recruitment Saam Tv
naukri-job-news

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी; २५०० पदांसाठी भरती; अर्ज करण्याची मुदत वाढली; वाचा सविस्तर

Bank Of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा ही सर्वात मोठ्या बँकेपैकी एक आहे. या बँकेत नोकरी करण्याची संधी आता तुम्हाला मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी

२५०० रिक्त पदांसाठी भरती

लोकल बँक ऑफिसर पदावर काम करण्याची संधी मिळणार

सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २५०० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवून देण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२५ होती. ही तारीख वाढवून देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी २१ ते३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला www.bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

पात्रता (Eligibility)

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डिग्रीसोबतच अनुभवदेखील गरजेचा आहे. उमेदवाराने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. सीए, इंजिनियरिंग, मेडिकलमध्ये डिग्री प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रामीण बँकेत १ वर्षांपर्यंत अधिकारी म्हणून काम केलेले असावे. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचं ज्ञान असावे.

या नोकरीसाठी अर्ज करताना १०वीचे मार्कशीट, १२वीचे मार्कशीट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, पासपोर्ट साइज फोटो, प्रोफेशनल डिग्री सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर परीक्षेबाबत सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. परीक्षा कधी आणि कुठे होणार आहे याबाबत माहिती दिली जाईल. त्यानंतर या परीक्षेत निवड झाल्यावर उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईहुन कसारा येणाऱ्या ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामागे राजकारण?सरकार आणि धनखडांमध्ये कुठे पडली ठिणगी?

Goodluck Cafe: 'गुडलक' कॅफेचे पुन्हा 'बॅड लक'; आता अंडा भूर्जीमध्ये आढळलं झुरळ

Manikrao Kokate: कृषीमंत्री पुन्हा बरळले, 'शासन भिकारी' मुख्यमंत्र्यांची कोकाटेंना तंबी

Maharashtra Politics : बटन दाबलं की दिल्ली हादरेल, भाजपमध्ये भूकंप येईल, मग दाबा बटन; गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंना आव्हान

SCROLL FOR NEXT