Bank Of Baroda Saam Tv
naukri-job-news

Bank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; निवृत्त उमेदवारदेखील करु शकतात अर्ज; जाणून घ्या पात्रता आणि अर्जप्रक्रिया

Bank Of Baroda Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी ६५ वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

Bank Jobs: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये करस्पॉन्डंट सुपरवायजर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती bankofbaroda.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. नोकरीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

बँक ऑफ बडोदाच्या या भरतीसाठी उमेदवार ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. जर तुमची बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी जास्तीत जास्त ६५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.सेवानिवृत्त झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या कर्मचाऱ्यांनी बँकेत काम केलेले असावे.

जर फ्रेशर्स उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर उमेदवाराने Msc (IT)/BE (IT),MCA,MBA केलेले असावे. फ्रेशर्ससाठी उमेदवारांची वयोमर्यादा २१-४५ निश्चित करण्यात आली आहे.

ही भरती बँक ऑफ बडोदाच्या उदयपूर शाखेसाठी केली जाणार आहे. उमेदवारांना स्थानिक भाषांचे ज्ञान असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या १५०००- २०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

याचसोबत अनेक बँकामध्ये सध्या भरती सुरु आहे. आयबीपीएसद्वारे ही भरती केली जाणार आहे. अनेक पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये ११ नॅशनल बँकामध्ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठीदेखील तुम्ही अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : एक कर्ता व्यक्ती गेल्याने सगळी समीकरणे बदलून जातात- सत्यजीत तांबे

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्याशिवाय राजकारण अळणी, दादांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी व्यक्त केलं दुःख

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा; रितेश देशमुख ते सुबोध भावे, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death: अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केला शोक व्यक्त

Ajit Pawar Death : महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला, अजित पवार यांच्या निधनानंतर दिल्लीपासून ते राज्यापर्यंत सर्व दिग्गज नेते झाले भावुक

SCROLL FOR NEXT