Bank Job Saam TV
naukri-job-news

Bank Jobs: पदवीधरांना बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; UCO बँकेत भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

UCO Bank Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युको बँकेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. युको बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ आहे.

युको बँकेत सिनियर रिस्क ऑफिसर, डेटा संरक्षण अधिकारी, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक डेटा विश्लेषक, व्यवस्थापक अर्थशास्त्रज्ञ, ऑपरेशनल जोखीम सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेत अधिकारी होण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Bank Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच पदव्युतर पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.B.E/B.Tech/M.Tech/B.Sc/M.sc पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ३५ ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करताना ६०० रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये फी भरायची आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ आहे. (UCO Bank Recruitment)

SIDBI भरती (SIDBI Recruitment)

सध्या स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रेड ए आणि ग्रेड बी ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Irregular Periods: गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास पिरीयड्सची समस्या होईल दूर; अनिरुद्धचार्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT