Bank Job Saam Tv
naukri-job-news

Bank Job: नोकरी शोधताय? पदवीधरांसाठी पंजाब अँड सिंध बँकेत सुरु आहे भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Punjab And Sind Bank Recruitment: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेत सध्या भरती सुरु आहे. १२वी पास तरुणांसाठी करिअरची सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी punjabandsindbank.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. (Punjab And Sind Bank Recruitment)

पंजाब अँड सिंध बँकेतील या नोकरीसाठी १०० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग दिल्ली आणि पंजाबमध्ये केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

पंजाब अँड सिंध बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. तसेच त्या व्यक्तीला स्थानिक भाषा माहित असणे गरजेचे आहे. (Bank Jobs)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिटनुसार होणार आहे. त्यांच्या गुणांच्या आधारे नोकरी मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांना करिअरची सुरुवात करायची आहे त्यांनी या नोकरीसाठी नक्की अर्ज करावेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची ही चांगली संधी आहे. (Punjab And Sind Bank)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT