IDBI Bank Recruitment Google
naukri-job-news

IDBI Recruitment: IDBI बँकेत नोकरीची संधी; १००० रिक्त पदांसाठी भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

IDBI Bank Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत १००० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

तरुणांना नेहमी चांगल्या पगाराची नोकरी हवी असते. बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.सध्या आयडीबीआय बँकेत भरती सुरु आहे. आयडीबीआय बँकेतील नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.१००० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्ह (सेल्स अँड ऑपरेशन) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. आज म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (IDBI Bank Job)

आयडीबीआय बँकेच्या या नोकरीसाठी तुम्ही idbibank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०२४ आहे.

आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यालयातून कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. याचसोबत कॉमप्युटर/आयटीबाबत ज्ञान असणे गरजेचे आहे. याचसोबत २० ते २५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

आयडीबीआयमधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे जाऊन करिअर सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर स्वतः ची माहिती, सही आणि फोटोग्राफ अपलोड करावा लागेल. यानंतर शुल्क भरुन फॉर्म अपलोड करा. (IDBI Bank Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सर्वप्रथम ऑनलाइन टेस्ट द्यावी लागणार आहे. यामध्ये कटऑफपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड करावी लागेल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी, मेडिकल टेस्ट करावी लागणार आहे. (Bank Jobs)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT