सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. एपेक्स बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या बँकेत नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ५ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.बँकेत भरती मोहिमेद्वारे एकूण १९७ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
एपेक्स बँकेच्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासा सांगितले आहे. मध्य प्रदेशमध्ये ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. apexbank.in वर जाऊन तु्म्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.
या नोकरीसाठी पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएटल पदवी प्राप्त उमेदवार, सीए पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.१८ ते २५ लयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १२०० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे. १.५ लाख ते १ लाख ४३ हजार रुपये उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.