Anganwadi Bharti Saam Tv
naukri-job-news

Anganwadi Bharti: १२वी पास महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अंगणवाडीत १८००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

Anganwadi Bharti 2025: अंगणवाडीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अंगणवाडीत सध्या १८८८२ रिक्त पदांवर भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अंगणवाडीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेत १८००० पेक्षा जास्त पदे भरती केली जाणार आहेत.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीबाबत माहिती स्वतः आदिती तटकरेंनी दिली होती.

अंगणवाडी सेविका पदासाठी एकूण ५६३९ जागा रिक्त आहेत. तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी १२३४२ पदे रिक्त आहेत. एकूण १८८८२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहेत.

अंगणवाडीतील या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३५ असणे गरजेचे आहे. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या त्यांच्याच स्थानिक परिसरात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त २ मुले असावीत.

तसेच या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे शिक्षण १२वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कार्यालयीन वेळेत अर्ज करु शकतात. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करायचा आहे.

इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती

सध्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतदेखील भरती सुरु आहे.सर्किल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे.यासाठी तुम्हाला www.ippbonline.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Alibaug Travel : अलिबागमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

SCROLL FOR NEXT