AIIMS Recruitment SAAM TV
naukri-job-news

AIIMS Recruitment: महिना १४२००० रुपये पगार, AIIMS मध्ये नोकरीची संधी; असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ४६ जागा, जाणून घ्या डिटेल्स

AIIMS Recruitment 2024: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. एम्समध्ये सहाय्यक पदासाठी भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS)मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती करण्यात येणार आहे.

AIIMS नवी दिल्ली आणि NCI झज्जर मध्ये ४२ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना rrp.aiimsexams.ac.in या वेबसाइटवर अर्ज करु शकतात. एम्समध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२४ आहे.

एम्समध्ये विविध विभागात सहाय्यक प्राध्यापकांची गरज आहे. त्यामुळेच ही भरती जाहीर केली आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देण्यात आली आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांना १ वर्षाच्या किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी काम करावे लागेल. या नोकरीसाठी उमेदवारांना १,४२,५०६ रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ३००० रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २४०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाचे व्हेरिफिकेशन केले जाईल. त्यानंतर त्यानंतर एम्स नवी दिल्ली येथे मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.याबाबत सर्व माहिती वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येईल.

अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम उमेदवारांना rrp.aiimsexams.ac.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर फॅकल्टी रिक्रूटमेंट या टॅबवर क्लिक करावे.यानंतर सहाय्यक पदासाठी अर्ज करा. यानंतर संपूर्ण माहिती वाचा त्यानंतर तुमची माहिती भरुन लॉग इन करा. यानंतर अर्ज भरुन फॉर्म सबमिट करा.या फॉर्मची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT