Zombie Virus News  saam tv
देश विदेश

Zombie Virus : जगावर नव्या व्हायरसचं संकट; ४८,५०० वर्षांपूर्वीचा झोम्बी विषाणू पुन्हा आला

४८,५०० वर्षांपूर्वीचा झोम्बी विषाणू बर्फात आढळला आहे.

Vishal Gangurde

Zombie Virus News : जगभरातील देश साधारण दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने अक्षरशः हैराण झाले आहेत. याचदरम्यान, जगावर पुन्हा एकदा नव्या माहामारीचं संकट येण्याची चिन्ह आहेत. नुकताच ४८,५०० वर्षांपूर्वीचा झोम्बी विषाणू बर्फात आढळला आहे.त्यामुळे या झॉम्बी विषाणूचा संसर्ग प्राणी आणि माणसांमध्ये होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हवामानातील बदलामुळे जागतिक तापमानवाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे बर्फातील पर्माफ्रॉस्ट झपाट्याने वितळत आहेत. बर्फातील पर्माफ्रॉस्ट वितळत असल्यामुळे दोन डझन विषाणू (Virus) पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाले आहेत. रशियातील एका तलावात ४८,५०० वर्षांपूर्वींचा झॉम्बी विषाणू बर्फात आढळून आला आहे. झॉम्बी विषाणू मनुष्यासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.

रशियात आढळला झॉम्बी विषाणू

ब्लूमबर्गच्या एका मीडिया रिपोर्टनुसार, युरोपीयन संशोधकांनी रशियाच्या सायबेरिया क्षेत्रात पर्माफ्रॉस्टपासून गोळा केलेले प्राचीन नमुने तपासले. रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांनी १३ विषाणूंच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करून, त्यांनी त्यांना पुनरुज्जीवित केले आहे. यात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, अनेक शतके बर्फात जमिनीखाली दबल्यानंतरही हे विषाणू संसर्गजन्य आहेत.

४८,५०० वर्ष जुना आहे झॉम्बी विषाणू

रिपोर्टच्या नुसार, झॉम्बी विषाणू ४८,५०० वर्ष जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. या विषाणूने २०१३ साली शोधलेल्या एका विषाणूचा विक्रम तोडला आहे. २०१३ साली सापडलेला विषाणू हा ३०,००० वर्ष जुना होता. तसेच हा झॉम्बी विषाणू हा अतिशय घातक आहे. झॉम्बी विषाणूचा प्राणी आणि माणसांमध्ये संसर्ग होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरीची संधी; या पदांसाठी निघाली भरती; आजच करा अर्ज

महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना जमीन विकता येते का?

Maharashtra Live News Update: अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Signs Of Stomach Cancer: पोटाच्या कॅन्सरचा ट्यूमर शरीरात असताना दिसतात 'ही' 8 लक्षणं

Soft Idli Recipe: इडली चिकट, वातड होतेय? मग पिठात 'हा' १ पदार्थ वापरा; मऊ लुसलुशीत होतील इडल्या

SCROLL FOR NEXT