Zombie Virus  Google
देश विदेश

Zombie Virus News: झोम्बी व्हायरस कोरोनापेक्षाही खतरनाक! नव्या महामारीचं संकट, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

Zombie Virus: कोरोना अजून संपलेला नाही तोच आणखी एका व्हायरसचा धोका वाढला आहे. आर्कटिक आणि इतरत्र बर्फाखाली दबलेल्या विषाणूमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत शास्त्रज्ञांनी इशारा दिलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Zombie Virus Could Start Pandemic

कोरोना व्हायरसमुळे (corona virus) झालेला विध्वंस सगळ्यांना आठवतोय. कोरोना महामारीने लाखोंचा बळी घेतला, यातून अजून व्यवस्थितपणे सावरलेलो देखील नाही. तोच आता नवीन विषाणूचा धोका (Zombie Virus) निर्माण झाला आहे. आर्क्टिक आणि इतरत्र बर्फाखाली दबलेल्या विषाणूमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे. या व्हायरसला झोम्बी व्हायरस म्हणतात. शास्त्रज्ञांनी म्हटलंय की, आर्कटिक पर्माफ्रॉस्ट वितळण्यापासून 'झोम्बी व्हायरस' बाहेर येऊ शकतात. (Marathi Latest News)

मोठे आजार पसरू शकतात

झोम्बी व्हायरस हजारो वर्षांपासून जमिनीत गाडले गेले आहेत. जर पृथ्वीचं तापमान असंच वाढत राहिले, तर हे विषाणू मोठा आजार पसरवू शकतात. याच धोक्याचा अंदाज घेऊन, शास्त्रज्ञ आर्क्टिक मॉनिटरिंग नेटवर्क तयार करत आहेत. यातून या विषाणूमुळे उद्भवलेल्या सुरुवातीच्या रूग्णांची माहिती मिळेल, मग त्यापद्धतीने उपाययोजना करता येतील. याआधीही वैज्ञानिकांनी या विषाणूचा धोका समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संपूर्ण जगाला विषाणूचा धोका

सायबेरियन पर्माफ्रॉस्टमधून घेतलेल्या नमुन्यांचा अभ्यास करून झोम्बी व्हायरस शोधण्यात आले होते. 13 विषाणूंचे नमुने गोळा करून त्यावर संशोधन करण्यात आलं. जर आर्क्टिक पर्माफ्रॉस्ट असेच वितळत राहिले, तर झोम्बी व्हायरस (Zombie Virus) भयानक परिस्थिती निर्माण करू शकतो. हे विषाणू एकपेशीय जीवांना संक्रमित करू शकतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय.

विषाणू 48,500 वर्षे जुना

सात वेगवेगळ्या सायबेरियन ठिकाणांवरील अनेक विषाणू संसर्ग पसरवण्यास सक्षम होते, असं तपासात समोर आलंय. या विषाणूचा नमुना 48,500 वर्षे जुना आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत्या तापमानामुळे गोठलेला बर्फ वितळू लागला आहे. त्यामुळे या विषाणूचा धोका वाढला आहे.

बर्फ वितळल्याने धोका वाढला

पर्माफ्रॉस्ट हा थर हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा खाली असतो. तो नेहमी गोठलेला असतो. त्यात चिकणमाती, रेव आणि वाळू असते. हे सर्व बर्फामुळे एकत्र धरून ठेवलं जातं. वाढत्या तापमानामुळे गोठलेला बर्फ वितळू लागला आहे. त्यामुळे या विषाणूचा धोका (Zombie Virus) वाढला आहे. या विषाणूंशी संबंधित धोके अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी सायबेरियन पर्माफ्रॉस्टमधून घेतलेल्या नमुन्यांपैकी काहींचा अभ्यास केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT