Twitter Reply to Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

"मोदी सरकारमुळे माझे फॉलोअर्स वाढत नाहीत" राहुल गांधींच्या तक्रारीला ट्विटरनं दिलं 'हे' उत्तर

Rahul Gandhi Twitter Followers News: ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत आपले १ कोटी ९५ लाख फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

साम टिव्ही

नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर खात्याचे फॉलोअर्स (Twitter Followers) वाढत नसल्याची लेखी तक्रार ट्विटरकडे केली होती. ट्विवरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांना राहुल गांधींनी (Rahul Gandhi) २७ डिसेंबर २०२१ ला पत्र लिहित याबाबत तक्रार केली होती. राहुल गांधींच्या या पत्राची ट्विटरने (Twitter) दखल घेत त्यांना आपलं उत्तर कळवलं आहे.

हे देखील पहा -

आपल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले होते की, ट्विटर मोदी सरकारच्या (Modi Government) दबावाखाली नवीन फॉलोअर्स न वाढू देता ट्विटर ते मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरला काही तपशीलवार माहिती पाठवली होती. त्यातून त्यांनी निदर्शनास आणून दिले की पूर्वी दर महिन्याला सरासरी २.३ लाखांहून अधिक नवीन फॉलोअर्स वाढत होते. काही महिन्यांमध्ये तो आकडा वाढून ६.५ लाखांपर्यंत गेला होता. मात्र ऑगस्ट २०२१ पासून, म्हणजेच अकाउंट अनलॉक झाल्यापासून त्यांचे महिन्याला केवळ २५०० फॉलोअर्स वाढत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत आपले १ कोटी ९५ लाख फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

ट्विटरने राहुल गांधींचे अकाऊंट लॉक का केले होते?

ऑगस्ट २०२१ मध्ये दिल्ली येथील नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Delhi Rape Case) करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. मात्र यावेळी बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेतल्याचे फोटो राहुल गांधींच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले होते. कायद्याचं उल्लंघन झाल्याचं म्हणत राहुल गांधींचं अकाउंट एका आठवड्यासाठी लॉक करण्यात आलं होतं. लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ (Protection of Children from Sexual Offences Act 2012 -Pocso Act, पॉक्सो कायदा) यानुसार बलात्कार पिडीतेचे नाव, फोटो किंवा ओळख पटेल अशी कोणतीही महिती प्रसारित करणे अवैध आहे. याबाबत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं ट्विटर इंडियाला नोटीस पाठवत राहुल गांधींचे ते ट्विट हटवण्यास सांगितले होते. त्यानुसारच राहुल गांधींचे हे ट्विट डिलीट करण्यात करुन त्यांचं अकाउंटही लॉक करण्यात आलं होतं.

ट्विटरचं राहुल गांधींना उत्तर:

याप्रकरणी ट्विटरने आपली बाजू स्पष्ट केली आहे. ट्विटरकडून राहुल गांधींना कळवण्यात आलं की, तुमच्या अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्या अगदी बरोबर असून त्यात कुठलीही तफावत नाही. ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या ही संगळ्यांना दिसत असून ती अचूक ठेवण्यासाठी आम्ही मशीन लर्निंगचा वापर करतो. त्यामुळे फॉलोअर्सच्या संख्येत गडबड होऊ शकत नाही असं ट्विवटरकडून सांगण्यात आलंय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Achyut Potdar Death : सिनेसृष्टीवर शोककळा, 3 Idiots मधील प्रोफेसर काळाच्या पडद्याआड

Hingoli Heavy Rain Flood : पावसाचा जोर वाढला, हिंगोलीत महापुरामुळे दोघांचा मृत्यू, मृतांच्या गावावर शोककळा

Mumbai : शाळेतून परत येताना बेस्टने उडवले, माय-लेकाचा जागीच मृत्यू

Pune News: पुणेकर सर्दी-खोकल्याने वैतागले! पावसाळ्यात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं

SCROLL FOR NEXT