BJP leader Yumnam Khemchand Singh elected as the new Chief Minister of Manipur. saam tv
देश विदेश

Manipur Politics: युमनाम खेमचंद सिंह होणार नवे मुख्यमंत्री; एका वर्षानंतर हटणार मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट

Manipur News CM Yumnam Khemchand Singh: भाजप नेते युमनम खेमचंद सिंह यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. ते मणिपूरचे नवे मुख्यमंत्री होतील. यामुळे एक वर्षानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Bharat Jadhav
  • युमनम खेमचंद सिंह मणिपूरचे नवे मुख्यमंत्री होणार

  • भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड

  • सुमारे एका वर्षानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट हटणार

गेल्या वर्षभरापासून राष्ट्रपती राजवटीत असणाऱ्या मणिपूरला आता नवे मुख्यमंत्री मिळणार आहेत. भाजप नेते युमनम खेमचंद सिंह यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आलीय. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत युमनम खेमचंद सिंग विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली गेली. आज सायंकाळी ५ वाजता भाजप मुख्यालयात मणिपूरमधील भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीत युमनम खेमचंद सिंग यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली.

मणिपूरमध्ये जवळपास एक वर्षापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. दरम्यान भाजपच्या विस्तार कार्यालयात भाजप सरचिटणीसांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक झाली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, संघटन सरचिटणीस बीएल संतोष आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल उपस्थित होते.

कोण आहे युमनम खेमचंद सिंह?

नवी दिल्ली येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर ज्येष्ठ भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी पक्षला मजबूत करण्याचे काम केले. त्यावेळी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. युमनाम खेमचंद सिंह हे मणिपूरमधील एक प्रमुख भाजप नेते आणि दोन वेळा आमदार राहिले आहेत. २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ते सिंगजामेई विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

यावरून राज्याच्या राजधानी क्षेत्रात त्यांची मजबूत राजकीय पकड असल्याचे स्पष्ट असल्याचं दिसते. दरम्यान मार्च २०१७ मध्ये ते मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. २०२२ पर्यंत त्यांनी पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ बजावला होता. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ राजकीयदृष्ट्या संवेदनशील काळात सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी ओळखला जातो.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्या बिरेन सिंग सरकारमध्ये युमनम खेमचंद सिंग यांना कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना नगर प्रशासन, गृहनिर्माण आणि शहरी विकास, ग्रामीण विकास आणि पंचायती राज आणि शिक्षण ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Korean Investment In Maharashtra: कोरियन उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करणार; पुण्यात झाली महत्वाची बैठक

Maharashtra Live News Update: पुणे-कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात फ्रेश आणि ग्लोइंग लूक कसा ठेवावा? वापरा या सोप्या मेकअप टिप्स

Kalyan News : रिडेव्हलपमेंट सुरू असताना सुरक्षा भिंतीवरून वाद; दोन विकासक गटात तुंबळ हाणामारी

PAN Card Update : केवळ आधार कार्ड वापरून पॅन कार्ड बनवता येणार नाही; 'या' कागदपत्रांचीही गरज लागणार; पण कधीपासून?

SCROLL FOR NEXT