Varanasi Namo Ghat Women Watchman Fight Video Twitter/@vishnutiwariKNP
देश विदेश

Video : लाथा-बुक्क्यांनी एकमेकींना धुतलं; नमो घाटावर तरुणी-वॉचमन यांच्यात तुफान हाणामारी

Varanasi Namo Ghat Women Watchman Fight Video : दोघींच्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाराणसी: पंतप्रधान मोदींच्या मतदार संघातील ड्रीम प्रोजेक्ट असलेला वाराणसीतील (Varanasi) नमो घाटाचे (Namo Ghat) बांधकाम सुरू आहे. हा प्रकल्प आकर्षणासाचा विषय ठरला असला तरी उत्तर प्रदेशात सध्या वेगळ्याच कारणामुळे हा प्रकल्प चर्चेत आला आहे. नमो घाटाच्या गार्डनमध्ये महिला सुरक्षारक्षक आणि एक तरुणी यांच्यात तुफान हाणामारी (Fight) झाली आहे. या हाणामारीच्या व्हिडिओत (Viral Video) दोघीजणी एकमेकींनी लाथा-बुक्क्यांनी बदडत असल्यांचं दिसतंय. सुरक्षारक्षक असलेली महिलाही काही कमी नव्हती, तिनेही तरुणीला खाली जमिनीवर लोळवत धू-धू धुतलं आहे. दोघींच्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Namo Ghat Fight Video)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी आपल्या मैत्रिणीसह नमो घाट या ठिकाणी आली होती, सध्या या वास्तूचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे आतमध्ये जाण्यास सर्वसामान्यांना बंदी आहे. असं असतानाही ही तरुणी आपल्या मैत्रिणीसह बागेत शिरत होती. या बागेच्या सुरक्षेसाठी ड्यूटीवर असलेल्या महिला सुरक्षा रक्षकाने तिला हटकलं. यावरुन दोघींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद पुढे आणखीन वाढला आणि दोघींमध्ये धक्का-बुक्की झाली, याचं रुपांतर पुढे तुफान हाणामारीत झालं. दोघींनीही एकमेकींनी चांगलंच धुतलं. महिला वॉचमनही काही कमी नव्हती, तिनेही तरुणीला जमिनीवर लोळवत तरुणीची धुलाई केली, तरिही तरुणीने महिला वॉचमनला फटके मारले. यावेळी परिसरत बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. यापैकी एकाने या मारहाणीचा व्हिडिओ शूट केला आहे, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत आहे.

याआधीही असं घडलं आहे

वाराणसीच्या आदमपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी मुलीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, त्यामुळे कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. नमो घाटात प्रवेश करण्यासाठी अशा घटना दररोज घडत असून त्यामुळे येथील वातावरण बिघडत असल्याचे घाटाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले. तिथे भेटायला आलेली ही तरुणी आणि महिला सुरक्षा कर्मचारी यांच्यात वाद झाल्याची चर्चाही जोरात सुरू आहे.

काय आहे प्रोजेक्ट नमो घाट?

नमो घाट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट काशीमध्ये तयार करण्यात आला आहे. वाराणसीचे प्रवेशद्वार आदिकेशव ते राज घाट दरम्यान 'नमो घाट' तयार करण्यात आला आहे. वाराणसीच्या या हायटेक घाटावर पर्यटकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. वाराणसीचा नमो घाट ३५ कोटी खर्चून हायटेक करण्यात आला आहे.

वाराणसी स्मार्ट सिटीचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. डी. वासुदेवन यांच्यानुसार, वाराणसीच्या या घाटात ओपन थिएटर, सीएनजी स्टेशन, फ्लोटिंग स्टेशन, फूड कोर्ट यासह अनेक सुविधा असतील. दुसऱ्या टप्प्यात येथे वॉटप अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, हेलिपॅड, चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही तयार केले जाणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT