Crime News Saam tv
देश विदेश

Crime News: बापरे बाप! तरुणाने गिळली तब्बल ५६ ब्लेड्स; अवस्था पाहून डॉक्टरही हादरले

ब्लेड गिळल्यामुळे त्याच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. शिवाय पोटात ब्लेड गेल्यामुळे संपूर्ण अंगावर सूज आली आहे..

Gangappa Pujari

Jalore News: नोकरीच्या त्रासामुळे एका २४ वर्षीय तरुणाने चक्क ५६ ब्लेड्स गिळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील (Rajsthan) जालौरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कामाच्या ताणामुळे आत्महत्या करण्याच्या हेतूने तरुणाने हे पाऊल उचलल्याचे कारण समोर आले आहे. त्याच्या पोटातून बऱ्यापैकी ब्लेड्स काढले असून त्याची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेवू.

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्लेड गिळलेल्या तरुणाचं नाव यशपाल सिंग असं आहे. यशपालने ब्लेड गिळल्यामुळे त्याच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. शिवाय पोटात ब्लेड गेल्यामुळे संपूर्ण अंगावर सूज आली होती. शिवाय शरीराच्या आतमधील भागात गंभीर जखमाही झाल्या होत्या. या तरुणाच्या शरीरातील ब्लेड काढण्यासाठी सात डॉक्टरांच्या पथकाने तब्बल ३ तास शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याचे प्राण बचावले.

ब्लेड गिळल्यानंतर तरुणाला उलट्या व्हायला लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तरुणाचे एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरांना त्याच्या पोटात ब्लेड असल्याचे लक्षात आले, ज्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले. डॉक्टरांनी या तरुणाची शस्त्रक्रिया करुन त्याच्या पोटातून तब्बल ५६ ब्लेड बाहेर काढले.

यशपालने कव्हरसह ब्लेडचे ३ पॅकेट गिळले होते. शिवाय त्याने हे कृत्य चिंता किंवा नैराश्यातून केल्याची शक्यता आहे. यशपालने ब्लेडचे २ भाग करुन ती कव्हरसह खाल्ली, ज्यामुळे ती त्याच्या शरीरात गेली. त्याने जर ब्लेड न मोडता खाल्ले असते तर ते घशातच अडकले असते, आत गेलेच नसते असंही डॉक्टर म्हणाले. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi New Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Habits: रात्रीच्या या 5 वाईट सवयींचा आरोग्यावर होतो परिणाम

SaamTV Exit Poll: सांगलीचं मैदान भाजपनं मारलं; एकहाती सत्ता राहणार?

Municipal Elections Voting Live updates: वसई पूर्वेच्या वसंत नगरीतील सेठ विद्यामंदिर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

Saam Tv Exit Poll: नाशिकमध्ये फडकणार महायुतीचा झेंडा? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Saam TV exit poll: धुळ्यामध्ये भाजपाची एकहाती सत्ता येणार? पाहा एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात

SCROLL FOR NEXT