Manasvi Choudhary
रात्रीच्या वेळी आपण काय करतो याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
झोपण्यापूर्वी मोबाईल पाहिल्याने त्यातील 'निळा प्रकाश' शरीरातील मेलाटोनिन कमी करतो. यामुळे झोप उशिरा येते आणि सकाळी थकवा जाणवतो.
रात्री उशिरा किंवा जड जेवल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि वजन वाढण्याची समस्या उद्भवते.
रोज वेगवेगळ्या वेळी झोपल्याने शरीराचे 'बायोलॉजिकल क्लॉक' बिघडते, ज्याचा परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो.
रात्री चहा किंवा कॉफी घेतल्याने मेंदू उत्तेजित राहतो आणि गाढ झोप (Deep Sleep) मिळत नाही.
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि चांगली झोप येते
मन शांत करण्यासाठी आणि चांगल्या विचारांसाठी रात्री झोपण्यापूर्वी वाचन व ध्यान करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.