देश विदेश

ईअरफोन मुळे तरुणाने गमावला जीव; कानातच झाला ब्लास्ट

काही बहाद्दरांना तर दिवसभर ईअरफोन लावून गाणी ऐकत बसायची सवय असते. पण याच ईअरफोनने हो याच ईअरफोन ने एका तरुणाचा जीव घेतला आहे.

वृत्तसंस्था

जयपूर: लोकांच्या हातात मोबाईल Mobile आणि कानात सतत ईअरफोन Earphone लावून ठेवलेले असतात. बहुतेक लोक ईअरफोनचा Eaphones खूप वापर करतात. जेव्हा हातात मोबाईल धरून बोलणे शक्य असते तेव्हाही ते ईअरफोन लावून बोलत असतात. काही बहाद्दरांना तर दिवसभर ईअरफोन लावून गाणी ऐकत बसायची सवय असते. पण याच ईअरफोनने हो याच ईअरफोन ने एका तरुणाचा जीव घेतला आहे.

हे देखील पहा-

एका तरुणाच्या कानातच चक्क ईअऱफोनचा ब्लास्ट Blast झाला आहे. त्यानंतर तरुणाच्या कानातून भळाभळा रक्त वाहू लागले. यामुळे त्याचा मृत्यूही झाला आहे. ही धक्कादायक घटना आहे एका तरुणाची जो राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील उदयपुरिया गावातील आहे.

कानात ईअरफोन २८ वर्षांच्या राकेश नागरने घातले होते. माहिती आहे की, अचानक त्याच्या कानातच हा फुटला आणि त्यावेळी मोठा आवाज झाला. त्याच्या कानातून रक्त अति प्रमाणात वाहू लागले. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.

वृत्तानुसार, डॉक्टरांनी Doctors शक्यता वर्तवली की, त्याचा मत्यू हार्ट अटॅकमुळे झाला असावा. रुग्णालयातील डॉ. एलएन रूंडल यांनी सांगितले की, या तरुणाचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाला असावा. कानात अचानक ते फुटल्यामुळे त्याला अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT