Mobile Phone charger Yandex
देश विदेश

MP Mobile Phone Blast : स्वयंपाक करताना कढईत पडला मोबाइल, बॅटरीच्या स्फोटात तरुणाचा गेला जीव

Mobile Phone Blast in Madhya pradesh : मध्य प्रदेशात एका तरुणाचा मोबाईल स्वयंपाक करताना कढईत पडला. त्यानंतर झालेल्या स्पोटात तरुणाचा जीव गेला आहे.

Vishal Gangurde

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील लहरमध्ये एका तरुणाचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. युवकाच्या शर्टाच्या खिशातून मोबाईल गरम कढाईतील तेलात पडला. त्यानंतर या मोबाईलचा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर उकळत्या तेल तरुणाच्या अंगावर पडलं. या घटनेने तरुणाने जीव गमावला आहे.

या दुर्घटनेनंतर तरुणाला सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्याला ग्वालियर येथील रुग्णालयात जाण्यास सांगितलं. दुसऱ्या रुग्णालयात नेताना त्यांची रुग्णवाहिका रस्त्यावरील ट्राफिकमध्ये अडकली. या संपूर्ण घटनेत तरुणाने अर्ध्या रस्त्यात जीव सोडला.

या दुर्घटनेनंतर तरुणाला सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्याला ग्वालियर येथील रुग्णालयात जाण्यास सांगितलं. दुसऱ्या रुग्णालयात नेताना त्यांची रुग्णवाहिका रस्त्यावरील ट्राफिकमध्ये अडकली. या संपूर्ण घटनेत तरुणाने अर्ध्या रस्त्यात जीव सोडला.

या घटनेतील मृत तरुणाचं नाव चंद्र प्रकाशपुत्र रामप्रकाश दोहरे असं आहे. या तरुणाने शर्टाच्या वरील खिशात मोबाईल ठेवल्याने जीव गमावला. शर्टाच्या खिशातील मोबाईल उकळत्या तेलाच्या कढईत पडल्याने भीषण दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाला उपचारासाठी रुग्णवाहिकने ग्वालियरला घेऊन निघाले होते. रस्त्यातील सिंध नदीवरील पुलावर प्रचंड वाहतूककोंडी होती. त्यामुळे या तरुणाने रुग्णवाहिकेतच जीव सोडला. रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोहोचण्यास दोन तास लागले.

नेमकं काय घडलं?

मृताच्या काकाने म्हटलं की, 'चंद्रप्रकाश त्यांच्या घरात भाजी बनवत होता. अचानक गरम तेलात मोबाईल पडला आणि स्फोट झाला. तेल आणि आगीमुळे तो होरपळून निघाला. या घटनेनंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेलं. मात्र चंद्रप्रकाशचा जीव वाचू शकला नाही'.

नातेवाईकांचे म्हणणं आहे की, चंद्रप्रकाशला वेळेत ग्वालियरमधील रुग्णालयात नेलं असतं तर त्याचा जीव वाचला असता. मृत चंद्रप्रकाशचं बुधपुरा भागात पंक्चरचं दुकान होतं. चंद्रप्रकाश या दुकानातील कमाईतून उदरनिर्वाह करत होता. पत्नी आणि दोन मुले असा त्याचं कुटुंब होतं. त्याला एक १४ वर्षांची मुलगी होती. तर ८ वर्षांचा मुलगा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT