Shreya Maskar
बदलते वातावरण, धूळ, ॲलर्जी, मातीचे कण यांमुळे वारंवार शिंका येऊ लागतात. वारंवार शिंका येत असतील रामबाण घरगुती उपाय करा.
वारंवार शिंका आल्याने डोके दुखायला लागते. तसेच डोकेदुखी वाढते.
सतत शिंका येत असेल तर गरम पाण्याची वाफ घ्या. डोक्यावर टॉवेल ओढून चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या. यामुळे शिंका थांबते.
एक ग्लास हळदीचे दूध प्या. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, संसर्ग कमी करण्यास मदत करतात.
शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे देखील शिंका येतात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. कोमट पाण्याचे सेवन करा.
वारंवार शिंका येत असेल तर एका ग्लासात पाणी, मध आणि किसलेले आलं टाका. तयार पाणी प्या. यामुळे शिंका येणे बंद होईल.
वारंवार शिंक येण्याचे आणखी एक कारण म्हणजे कमकुवत रोग प्रतिकारशक्ती. त्यामुळे लिंबू, संत्री, आवळा यांसारखी फळे खा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.